– परिसरात खळबळ
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा-कोरची, १२ ऑक्टोबर : गडचिरोली जिल्हयातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोरची तालुक्यात इसमाची गळा चिरून हत्या केल्याची घटना गुरूवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याचे सुत्रांव्दारे कळते. तर मृतकाचे नाव लखन सोनार (अंदाजे वय ३२) असे असल्याचे समजते.
सुत्राव्दारे मिळालेल्या माहितीनुसार, कोरची तालुक्यातील पोमके बेडगाव अंतर्गत येत असलेल्या दवंडी येथे ही घटना घडल्याचे समजते. सदर इसमाची खाटेवरच गळा चिरून हत्या केल्याची माहिती असुन याबाबत पोलीसांना माहिती देण्यात आली आहे. सदर घटना रात्रोच्या सुमारास घडली असून सकाळच्या सुमारास उघडकीस आली. बातमी लिहेस्तव पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते. हत्येचे कारण तसेच या हत्येमागील आरोपी कोण हे सुध्दा अद्याप कळु शकले नाही मात्र गावात विविध चर्चेला उत आल्याचे कळते. एकुणच संपुर्ण घटनेचा पोलीस सखोल तपास करतील तेव्हा हत्येमागील कारण व हत्याराचे गुढ उकल होणार आहे.
(The GDV, The Gadvishva, Gadchiroli News, Crime News Gadchiroli, North East Express, Bihar Relway Accident,Animal, Virat Kohli,Hardik Pandya,Australia vs South Africa,)