नक्षल्यांचे हत्यासत्र सुरूच : उपसरपंचाची केली हत्या

2738

– पीएलजीए सप्ताहाच्या पूर्वीच नक्षल्यांचे तांडव सुरू
The गडविश्व
कांकेर, दि.०१ : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त छोटा बेठिया पोलीस स्टेशन हद्दीतील कांदाडी येथील उपसरपंच रामसू कचलामी यांची नक्षल्यांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नक्षल्यांनी २९ नोव्हेंबर ला कांदाडी गावचे उपसरपंच रामसू कचलामी यांचे घरातून अपहरण केले होते. उपसरपंच हे पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत जनता न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावली व त्यानंतर जनता दरबारातच धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचे कळते. नक्षल्यांनी पत्रक टाकून हत्या केल्याचेही सांगितले.
दरम्यान पीएलजीए सप्ताहाच्या पूर्वी नक्षल्यांनी मोबाईल टॉवरला ही आग लावली तसेच पक्के रस्तेही खोदून ठेवल्याचे कळते. सदर हत्याची घटना घडल्यानंतर कुटुंबीयांनी भीतीपोटी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नसल्याचे समजते.
छत्तीसगड मध्ये नक्षल्यांचे हत्यासत्र सुरूच असून काही दिवसांपूर्वीच तिघांची हत्या केली होती.तसेच गडचिरोली जिल्ह्यातही नक्षली पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयातुन हत्या करीत आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली असून भीतीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here