The गडविश्व
गडचिरोली, दि.०१ : अकोला येथे १ ते ५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या शालेय राज्यस्तर बॉक्सींग स्पर्धेकरिता गडचिरोली जिल्हयाचा बॉक्सींग संघ राज्य बॉक्सिंग स्पर्धे करिता रवाना झाला आहे.
नुकत्याच चंद्रपूर येथे पार पडलेल्या शलेय विभागिय बॉक्सींग स्पर्धेमध्ये गडचिरोली प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू १४ वर्षे वयोगटात मुला मध्ये ३४ किलो वजनगटात अंश जगदिश घकाते, ४६ किलो वजनगटात आदर्श दुर्योधन नागतोडे मुली मध्ये १७ वर्षे वयोगटात ४२ किलो खालील वजनगटात अदिती गीरिधर बांते, ४६ किलो वजनगटात दिशा प्रभाकर लोनबले, ५२ किलो वजनगटात भैरवी नरेंद्र भरडकर मुला मध्ये १७ वर्षे वयोगटात ४६ किलो वजनगटात रितेश गोपाल कंरगामी या खेळाडूंचा समावेश आहे.
हे सर्व खेळाडू जिल्हा बॉक्सींग कीडा प्रशिक्षण केंद्राचे नियमित प्रशिक्षणार्थी असून त्याना यशवंत कुरूडकर, पंकज मडावी, संतोष गैनवार, महेश निलेकार यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेतात. यांच्या यशासाठी जिल्हा क्रीडा अधीकारी प्रशांत दोंदल कीडा अधिकारी, घटाळे जिल्हा बॉक्सींग असोशिएशन चे जगदिश म्हस्के, सचिव यशवंत कुरूडकर, पंकज मडावी, रजत देशमुख, संतोष गैनवार, महेश निलेकार, निखील इंगळे, संजय मानकर, अनिल निकोडे व मीत्र परिवारानीं पुढिल वाठचालीस सुभेच्छा दिल्या.