– फटाक्यांची आतीषबाजीने व गुलाल उधळून विजयी उत्सव साजरा
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०९ : भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेत सत्ता काबीज केल्याने धानोरा शहरात उत्साहाचे वातावरण होते. या आनंदोत्सवाच्या निमित्ताने भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य जल्लोष साजरा करण्यात आला.
याप्रसंगी फटाके फोडून, मिठाई वाटून आणि गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पक्ष जिंदाबाद, नरेंद्र मोदीजी जिंदाबाद, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
याप्रसंगी आ.मिलिंद नरोटे, अंतुभाऊ साळवे, महादेव गणोरकर, राकेश खरवडे, सुभाष धाईत, सारंग साळवे, साजन गुंडावार, सुभाष खोबरे, राकेश दास, विजय कुमरे, मिलिंद किरंगे,घनश्याम मडावी, प्रकाश मारभाते, सुजित दास, भकतदास गडपायले, अमोल भलवे यांच्या उपस्थितीत विजयी जल्लोष उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष करत पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा केला. या विजयामुळे संपूर्ण धानोरा शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
