कारगिल चौक येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

15

कारगिल चौक येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
– ध्वजारोहण, देशभक्तीपर नृत्य व विद्यार्थ्यांच्या भाषणांनी रंगला सोहळा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : कारगिल स्मारक, कारगिल चौक येथे कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ व कारगिल स्मारक समितीच्या वतीने भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर नृत्य आणि प्रभावी भाषणांनी कार्यक्रमाला रंगत आली.
कारगिल स्मारकाचे संस्थापक तथा ज्येष्ठ पत्रकार उदय धकाते यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने परिसर भारावून गेला. श्री गुरुदेव उच्च प्राथमिक शाळा, नगर परिषद राजीव गांधी प्राथमिक शाळा तसेच विद्याभारती कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर सामूहिक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणेही सादर केली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक तुषार निकुरे व मीरा मडावी यांनी केले.
यावेळी मंडळाचे सचिव प्रकाश भांडेकर, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, प्रकाश धकाते, मार्गदर्शक सुनील देशमुख, डॉ. नरेश बिडकर, अॅड. विनीत लोखंडे, संजय गद्देवार, जि. के. बारसिंगे, मोबीन सय्यद, अजय पवार, सुचिता धकाते, नीलिमा देशमुख, वनिता भांडेकर, लक्ष्मी हजारे-कोसरे, प्रमिला कुंभारे, विजय लाकडे, संगीता धकाते, महेंद्र मसराम, रुपेश सलामे, बाळू मोटघरे, रामा हजारे, महादेव कांबळे, गजानन भारसागडे, आदित्य चिचघरे, अविनाश शेंडे, गणेश मेश्राम यांच्यासह शहरातील नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पोलिस विभागाने वाहतूक सुरळीत ठेवत चोख बंदोबस्त राखला. कार्यक्रमासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी पोलिस विभागाचे आभार मानले. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले.
कारगिल स्मारकाच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्यामुळे कारगिल चौक परिसरात देशभक्ती व राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here