शहरातील कार्यकुशल व्यक्तिमत्त्वांचा गौरव : महाराणा गणेश उत्सव मंडळाचा पुढाकार
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २३ : शहरात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराणा गणेश उत्सव मंडळ, कुरखेडा यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शहरातील कार्यकुशल व्यक्तिमत्त्वांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, उद्धवसेनेचे तालुका प्रमुख तथा पाणीपुरवठा सभापती आशीष काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलाश धोंडणे, शिंदेसेनेचे तालुका प्रमुख अनिकेत आकरे, लालचंद धाबेकर, डॉ. जगदीश बोरकर, डॉ. मयूर नाकाडे, नगरसेवक अतुल झोडे, भाजयुमो तालुका अध्यक्ष उल्हास देशमुख, इंजि. तुषार कुथे, लक्ष्मण धूळसे, सुशील बेहार, आसिफ शेख, नगरसेवक अशोक कंगाले, वनक्षेत्र सहाय्यक संजय कंकलवार, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष रूपाली कावळे, कल्पना मांडवे, चित्रा गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विधी व सामाजिक क्षेत्रात कार्यरत नगरसेवक अॅड. उमेश वालदे, पत्रकारितेच्या क्षेत्रातील सिराज पठाण, युवा होतकरू कंत्राटदार इंजि. शुभम गोटेफोडे, युवा मराठी उद्योजक रेशम तोंडरे व लोकेश लांजेवार, तसेच शासकीय आदिवासी वस्तीगृहाचे उपक्रमशील गृहपाल सदाशिव नरताम यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सागर निरंकारी, मंगेश मांडवे, जगदीश कुमरे, धिरज गणवीर, रोशन कुंभलवार, निलेश चंदनखेडे, राज नागापूरे, कुंदन देशमुख, विशाल शिंदिमेश्राम, सोमेश्वर पेंदाम, श्याम विखे, संकल्प राऊत, विकी अरगेलवार, हरिश पिल्लेवान, सुमित माकडे, अस्सू शेख, रूपेश राऊत, कुणाल लांजेवार, प्रमोद कोटांगले, उद्धव आठवले, नामदेव कवडो, गोलू घरडे, स्वप्नील खोब्रागडे यांनी विशेष परिश्रम घेतले.














