सार्वजनिक हनुमान मंदिर सभामंडप व जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन
– भाविकांसाठी नव्या सुविधांचा मार्ग मोकळा
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २३ : शहरातील गांधी वॉर्ड येथील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप उभारणी व मंदिर जीर्णोद्धाराच्या कामास नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजनांतून मंजुरी मिळाली असून, या विकासकामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. यानिमित्ताने प्रत्यक्ष बांधकामास अधिकृत प्रारंभ झाला आहे.
सभामंडप उभारणीसाठी २० लक्ष रुपये, तर मंदिर जीर्णोद्धारासाठी १० लक्ष रुपये असा एकूण ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्याने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या बांधकामामुळे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठी सोय निर्माण होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
या बांधकामाचे भूमिपूजन सार्वजनिक हनुमान मंदिर कमिटीचे अध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी व भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पंडित अविनाश दुबे महाराज यांच्या उपस्थितीत विधीपूर्वक पूजा-अर्चा करण्यात आली.
प्रसंगी मंदिर कमिटीचे सचिव श्याम लांजेवार, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती आशीष काळे, मंगेश मांडवे, भाजयुमो तालुका अध्यक्ष उल्हास देशमुख, नगरसेवक अतुल झोडे, चंदू नाकतोडे, सार्वजनिक हनुमान मंदिर महिला समितीच्या अध्यक्ष शारदा गाथाडे, तसेच नर्मदा डेकाटे, कविता खडसे, वनिता थोटे, ज्योती उईके, आशीष चौधरी, दुर्गेश मेश्राम, हेमराज मारबते, दुर्गेश देशमुख, रोहित निपाने, सचिन दुमाने यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. या विकासकामामुळे मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाणार असून भाविकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.














