The गडविश्व
गडचिरोली, १७ एप्रिल : गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन कर्करोगावर उपचार घेणे महागडे ठरते. गरीब व गरजूंवर जवळच्या भागात रोगाचे निदान व ऊयचार करता यावे, याकरिता चातगाव येथील सर्च रुग्णालयात कॅन्सरची ओपीडी सुरू करण्यात आली आहे. गुरुवार २० एप्रिल ला कर्करोग ओपीडी आयोजित केली आहे, नागपुरचे तज्ञ डॉ.सुशील मांनधनिया हे दर महिन्याच्या तिसर्या गुरुवारी कर्करुग्णांची तपासणी करतील.
स्तनांचा रंग बदलणे, स्तन लटकणे, गाठ येणे किंवा आकार बदलणे ही सर्व स्तंनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे श्वास लागणे अशक्तपाणा आणि थकवा जाणवणे, स्नायू आणि हाडे दुखणे ही सर्व फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. ही लक्षणे असणार्यांनी ओपीडीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन चातगाव येथील सर्च रुग्णालयाने केले आहे.
(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (PSG vs Lens) (News today) (Ashraf Ahmed) (Breaking News) (Femina Miss India 2023) (Atiq Ahmed)