विदर्भ इंटरनॅशनल स्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

466

The गडविश्व
गडचिरोली, १७ एप्रिल : स्थानिक विदर्भ इंटरनॅशनल स्कूल मध्ये १४ एप्रिल २०२३ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग सदस्य प्रीती चिचघरे यांनी केले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या नेहारिका मंदारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार श्रुती सांगोजी यांनी मानले. याप्रसंगी अलका मिसार यांनी अतिशय मोहक असे गायन सादर केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे वक्तव्य करिश्मा ओळख यांनी सादर केले. यावेळी कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) ( PSG vs Lens) (News today) (Ashraf Ahmed) ( Breaking News) (Femina Miss India 2023) (Atiq Ahmed) (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Celebration at Vidarbha International School
)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here