गडचिरोली : ‘त्या’ प्रेयसीचाही उपचाराअंती झाला मृत्यू

1826

– आरमोरी येथील प्रकरण
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : जिल्ह्यातील आरमोरी येथे एका घरी प्रेमीयुगलाने गळफास घेतल्याची घटना १६ मे रोजी घडली होती. या घटनेत प्रियकराचा मृत्यू झाला होता तर प्रेयसीवर उपचार सुरू होते. दरम्यान उपचाराअंती दोन दिवसांनी १८ मे रोजी तिचाही मृत्यू झाला.
आरमोरी येथील राहुल गजानन सावसाकडे याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमप्रकरण होते. १६ मे रोजी ते शहरातीलच एका महिलेक्या घरी भेटले. गप्पा मारल्या, बिर्यानी खाल्ली व त्यानंतर दोघांनीही त्याच खोलीत गळफास घेतला. यात राहुलचा मृत्यू झाला होता तर प्रेयसी बचावली होती. तिच्यावर ब्रम्हपुरी येथे उपचार सुरू होते मात्र १८ मे रोजी तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सदर घटनेने शहरात खळबळ उडाली असून या घटनेचा धडा घेत आता पालकही सतर्क झाले असून आपल्या पल्यांवर लक्ष ठेवून आहेत.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #armori )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here