गडचिरोली हादरलं! भाजीपाला विक्रेत्या दोन बहिणींना बँक कर्मचाऱ्यानेच घातला ४८ लाखांचा गंडा,आरोपी अटकेत
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : शहरातील दोन कष्टकरी भाजीपाला विक्रेत्या बहिणींना बँक खाते उघडून देण्याच्या बहाण्याने एका खासगी बँक कर्मचाऱ्याने तब्बल ४८ लाख ३७ हजार ७८७ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.
त्रिमूर्ती चौक परिसरातील जुली मारोती शिरपूरकर (३५) व त्यांची बहीण सविता पोहनकर या दोघी भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात. आरोपी मिथुन प्रभाकर गायकवाड (रा. खेडेगाव, ता. कुरखेडा जि. गडचिरोली) हा ech बँकेत सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत होता. त्याने दोन्ही बहिणींचा विश्वास संपादन करून एचडीएफसी व ॲक्सिस बँकेत खाती उघडून दिली. मात्र खात्यांचे नियंत्रण स्वतःकडे ठेवत त्यांच्या नकळत व्यवहार सुरू केले.
तपासात आरोपीने २८.५४ लाख रुपये रोख, ८ लाख रुपये परस्पर व्यवहारातून, तर ११.८३ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने काढल्याचे समोर आले. संशय आल्यावर बहिणींनी चौकशी केली असता आरोपीने टाळाटाळ केली. अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #BankFraud #FraudCase #TwoSisters #VegetableVendors #CrimeNews #Maharashtra #Arrested #BreakingNews #FinancialFraud #PoliceAction #GadchiroliNews #BankScam #IndiaNews #LatestNews














