गडचिरोली : सुगंधित तंबाखूच्या अवैध कारखान्यावर पोलिसांचा छापा, २२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

51

गडचिरोली : सुगंधित तंबाखूच्या अवैध कारखान्यावर पोलिसांचा छापा, २२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचे अवैधरित्या उत्पादन व साठवणूक करणाऱ्या टोळीवर गडचिरोली पोलिसांनी कारवाई केली. गट्टा (फु.) पोलिसांनी जांभळीझोरा येथे केलेल्या कारवाईत चार आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. या कारवाईत सुगंधित तंबाखू, उत्पादन व पॅकिंग साहित्य तसेच महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन असा एकूण २२ लाख ५० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी गट्टा (फु.) पोलीस मदत केंद्राच्या पथकाला जांभळीझोरा येथील अजीत जोहन कुजूर हा आपल्या घरी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करून त्याची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष घराची व परिसराची झडती घेतली. यावेळी घरात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा साठा तसेच पॅकिंगसाठी लागणारे साहित्य आढळून आले.

तसेच घराजवळ उभ्या असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनातूनही सुगंधित तंबाखूच्या चार चुंगळ्या आढळल्या. कारवाईत सुगंधित तंबाखूच्या १०३ पांढऱ्या चुंगळ्या, अतिरिक्त तंबाखूचा साठा, ‘मजा 108 हुक्का शिसा तंबाखू’ अशी नोंद असलेले पॅकेट्स, बॅक क्लोजर मशीन, ऑटोमॅटिक फिल्म सीलिंग मशीन, पोर्टेबल बॅग शिवण मशीन व स्ट्रेटनर मशीन तसेच स्कॉर्पिओ वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान अजीत कुजूर याने हा मुद्देमाल प्रशांत याडवार याचा असल्याचे सांगितले. तसेच साईनाथ टाटाजी कन्नाके, सचिन ज्ञानेश्वर कन्नाके आणि अभिजित यादव नान्हे हे त्याचे साथीदार असल्याची माहिती दिली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून गट्टा (फु.) पोलीस मदत केंद्रात संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजीत जोहन कुजूर, साईनाथ टाटाजी कन्नाके, सचिन ज्ञानेश्वर कन्नाके आणि अभिजित यादव नान्हे या चार आरोपींना २० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. तर प्रशांत याडवार हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि सहायक पोलीस अधीक्षक, धानोरा सुयश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. दयानंद भोंबे व पोलीस पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोउपनि. दयानंद भोंबे करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #chamorshinews #dogattack #Gadchiroli #GadchiroliPolice #MaharashtraPolice #TobaccoSeizure #FlavouredTobacco #IllegalTobacco #TobaccoSmuggling #CrimeNews #PoliceAction #GadchiroliNews #MaharashtraNews #CrimeNewsMaharashtra #IllegalBusiness #TobaccoRaid #NewsUpdate
india asian games, rachin ravindra, maharaja,nbems neet pg result,jimmy fallon,asian games japan 2026,2026 नवरात्रि तिथि,gta vi, svengoolie

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here