गडचिरोली : महामार्गावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर, सर्वीस रोड करीता अतिक्रमण हटविण्याची शेतकरी कामगार पक्षाची मागणी

596

-बेकायदेशीरपणे जाहिरात फलक, होर्डींग्ज आणि अनधिकृत बांधकामे
The गडविश्व
गडचिरोली, दि.१२ : शहरातून बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वीस रोडचे बांधकाम करण्यासाठी नगर परिषद हद्दीतील बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
गडचिरोली शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या सर्वीस रोडच्या जागेवर राष्ट्रीय महामार्गालगत प्रस्थापितांनी व व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने पक्के बांधकाम केलेले आहेत. यामुळे शहरात महामार्गाचे बांधकाम झाल्यानंतरही नागरिकांकरीता सर्वीस रोडचे बांधकाम होवू शकलेले नाही. तसेच मोठे व्यापारी व प्रस्थापितांच्या दबावामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
शहरातील महामार्गावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येवून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने नगर परिषद हद्दीतील सर्वीस रोड व इतर आरक्षित जागांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हटविणे गरजेचे असतांनाही त्याठिकाणी बेकायदेशीरपणे जाहिरात फलक, होर्डींग्ज आणि अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून आरक्षित आणि सर्वीस रोडवरील जागांवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि बेकायदेशीर जाहिरात फलक, होर्डींग्ज व इतर सर्व प्रकारचे अतिक्रमण नगर परिषद प्रशासनाने हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #shetkarikamgarpaksh #shekap #collectorsanjaymina #collector_sanjay_mina #शेतकरी_कामगार_पक्ष )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here