गोंडवाना विद्यापीठात महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा

333

-विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि.१२ : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 11 ते 17 मार्च 2024 या कालावधीत करण्यात आले आहे. सदर कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विदर्भसंघ, माजी रणजी क्रिकेटपटू रामेश्वर सोनुने यांच्या हस्ते पार पडले.या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे, वित्त व लेखा अधिकारी भास्कर पठारे, सुभाष पवार, सतीश पडोळे, दिपक घोणे, डॉ.‍ क्रिष्णा कारु, डॉ.‍ प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी उद्घाटनपर सामना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर या दोन संघात खेळविण्यात आला.

विविध विद्यापीठांचा उत्स्फूर्त सहभाग

महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, मुंबई विद्यापीठ मुंबई, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आदी विद्यापीठातील कर्मचारी या कुलगुरू चषकामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here