गडचिरोली : गट्टा दलममधील जहाल नक्षलीस अटक

1434

– २ लाखांचे बक्षीस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, १९ एप्रिल : नक्षल्यांच्या टीसीओसी कालावधी दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस मदत केंद्र गट्टा (जां.) हद्दीतील हाचबोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान, पोमकें गट्टा (जां.) येथील पोस्ट पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस बलच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षली साधु ऊर्फ कान्या ऊर्फ संजय नरोटे (३१) वर्षे, रा. झारेवाडा तह. एटापल्ली, जि. गडचिरोली यास १८ एप्रिल रोजी अटक केली. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एकुण २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान नक्षली टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात.
१७ एप्रिल रोजी गोपनिय खबरीच्या आधारे पोलीस जवनांनी नक्षलविरोधी अभियान राबविले. दरम्यान साधु ऊर्फ कान्या ऊर्फ संजय नरोटे यास अटक केली. तो २०१५ पासुन गट्टा दलममध्ये भरती होऊन सदस्य या पदावर कार्यरत होता. २८ मार्च २०२३ रोजी तो नक्षल दलम सोडुन घरुनच नक्षलविरोधी कारवाया करीत होता. त्याच्यावर पोलीस पार्टीवर ॲम्ब्युश लावणे, जाळपोळ करणे, पोलीस व निष्पाप नागरीकांना जिवे ठार मारणे, दरोडा इत्यादी गंभीर स्वरुपाचे २३ गुन्हे दाखल आहेत. त्यात १२ चकमक, २ पोलीस जवानांसहीत एकुण ८ खुन, २ जाळपोळ व १ दरोडा यांचा समावेश आहे. त्याचा धुळेपल्ली- २०२०, कोदुर-२०२०, टेकामेट्टा-२०२१, गोरगुट्टा – २०२१, गुंडरवाही ॲम्ब्युश- २०२० या चकमकींमध्ये सहभाग होता.
गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ६७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा.,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षल्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

(the gdv the gadvishva gadchiroli police arrest naxal) (gatta jambhiya) (gadchiroli sp nilotpal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here