तापमानात वाढ, उजळणी वर्गाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

272

– मुरमाडी येथील आश्रम शाळेत उजळणी वर्ग सुरु
The गडविश्व
प्रतिनिधी /अमिर्झा, १९ एप्रिल : सूर्य आग ओकतो आहे आणि तापमानात दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. अशा स्थितीत उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येते. असे असतांनाही
कसल्याही तमा न बाळगता अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा मुरमाडी येथे शिक्षक उजळणी वर्ग घेत असून विद्यार्थीही या वर्गाला उत्तम प्रतिसाद देत आहेत.
दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा मुरमाडी येथे अप्पर आयुक्त नागपुर यांच्या आदेशानुसार इयत्ता ९ व १० च्या विद्यार्थ्यांकरिता उजळणी वर्ग सुरु करण्यात आले आहे. या उजळणी वर्गात ४० ते ५० विद्यार्थी नियमीत हजर राहत असून सर्व विद्यार्थी हे निवासी आहेत. तसेच सर्व विद्यार्थी हे आदिवासी दुर्गम डोंगराळ भागातील आहेत. दिवसेंदिवस तापमानात वाढ होतांना दिसत आहे मात्र तेवढे तापमान असतांनाही कसल्याही तमा न बाळगता शिक्षक उजळणी वर्ग घेत आहेत आणि या उजळणी वर्गाला तितक्याच ताकदीने विद्यार्थी प्रतीसाद देत आहेत हे विशेष.
या उजळणी वर्गाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक एच.एम. चुधरी यांनी केले आहे.

(the gdv) (the gadvishva) (chandrapur news crime news acb trap saoli upri forest)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here