२०२३ च्या जिल्हा पोलिस भरती मध्ये निवड झालेल्या लक्ष्यवेध Warrior’s ची यशोगाथा

498

       मी तुषार बंडुनाथ काटेंगे माझं गाव चरविदंड हे गाव कुरखेडा तालुक्यात घनदाट जंगलात आहे. माझे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत तर माझी आई गृहिणी आहे. माझ्या वडिलांची नियुक्ती कोरची तालुक्यात असल्यामुळे माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरची येथे झाले त्यानंतर माझी निवड जवाहर नवोदय विद्यालय घोट आणि गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथे झाली. मी प्रवेश कुठे घ्यावा अशा द्विधा मनस्थितीत असताना गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथे इयत्ता ६ वी मध्ये प्रवेश घेतला. माझी शरीरयष्टी मजबूत असल्यामुळे गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे योगेश चव्हाण सर यांनी मला वूशू क्रीडा प्रकारात भाग घेण्यासाठी मला प्रोत्साहित केले. आणि त्यात मी यशस्वी झालो. सन २०१४ मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय वूशु या स्पर्धेत ६५ किलो वजन गटात कास्यपदक प्राप्त झाले. सन २०१५ मध्ये मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झालेल्या राष्ट्रीय वूशु या स्पर्धेत रजत पदक प्राप्त झाले. मी शालांत प्रमाणपत्र परीक्षा गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथून द्वितीय श्रेणीत प्राप्त झाल्यानंतर पुढे इयत्ता ११ मध्ये शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे कला शाखेत प्रवेश घेतला. सन २०१७ मध्ये इयत्ता १२ वी च्या परीक्षेत द्वितीय श्रेणीत पास झालो पुढे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. पदवी परीक्षा पास केल्यानंतर मी माझं करिअर घडवायचे ठरवले आणि पोलीस भरतीची तयारी केली सन २०१८ मध्ये मी पहिली पोलीस भरतीची परीक्षा दिली परंतु मला त्यात अपयश आले. (जो खचला तो संपला आणि जो उठला तो यशस्वी झाला) असेच माझेही झाले परत उठलो नवीन दिवस नवी सुरुवात केली. माझा लहान भाऊ प्रणय बंडुनाथ काटेंगे याने मला लक्ष्यवेध अकॅडमी मध्ये प्रवेश घ्यायला प्रेरित केले. मी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मला प्रा. राजीव खोबरे सर आणि मैदानी चाचणीचे प्रा. नंदनवार सर यांचे मला खूप सहकार्य लाभले. आणि २०२३ च्या जिल्हा पोलीस भरती मध्ये पोलीस वाहन चालक या पदाकरिता निवड झाली. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मला सतत प्रेरणा देणारी माझी आई व माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले बाबा व प्रा. राजीव खोबरे सर आणि नंदनवार सर यांच्या सहकार्याने आज मी यशस्वी झालो. मला माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी ‘The गडविश्व’ चे संपादक सचिन जिवतोडे सर यांना मनापासून धन्यवाद देतो.

– तुषार बंडूनाथ काटेंगे (निवड – पोलीस वाहन चालक २०२३)
मु. चरविदंड पो. मालेवाडा ता. कुरखेडा
जिल्हा गडचिरोली.

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (PSG vs Lens) (News today) (Ashraf Ahmed) (Breaking News) (Femina Miss India 2023) (Atiq Ahmed) (Success story of Lakshyavedh Warrior’s selected in District Police Recruitment 2023 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here