वडसा : ओव्हरटेक करण्याच्या नादात हायवाची ट्रक्टरला धडक

1882

– सुदैवाने जिवीतहानी नाही
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, १९ एप्रिल : कुरखेडा मार्गे वडसा कडे जाणाऱ्या हायवा ट्रक ने ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढे असलेल्या ट्रक्टरला धडक देत अपघात झाल्याची घटना बुधवार १९ एप्रिल रोजी सकाळी कुरखेडा-वडसा मार्गावर असलेल्या शंकरपुरच्या तलावानजीक घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा मार्गे एम एच ३५ एजी ९१३४ क्रमांकाची मालवाहू ट्रक्टर धानाचे पोते वाहतूक करत होता. दरम्यान शंकरपुर नजीकच्या तलावाजवळ मागेवुन येणाऱ्या हायवा ट्रक चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक्टरच्या समोरच्या चाकाला धडक दिली. यावेळी ट्रकचालकाचे नियंत्रण बिघडल्याने ट्रक थेट जंगलात शिरला तर ट्रक्टरची टाली पलटली असून ट्रॅक्टर क्षतिग्रस्त झाले. या अपघात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. घटनास्थळारून ट्रकचालक फरार झाल्याची माहिती असून काही काळ नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली आहे.
या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. अनेक अवजड वाहन मार्गक्रमण करत असतात. अनेकदा या मार्गावर अपघात झाले आहे. ©©©

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (PSG vs Lens) (News today) (Ashraf Ahmed) (Breaking News) (Femina Miss India 2023) (Atiq Ahmed) (wadsa desaiganj shankarpur trak accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here