गडचिरोली : २२ ला बी-फॅशन प्लाझा शॉपींग मॉल चा भव्य शुभारंभ

836

The गडविश्व
गडचिरोली, २० मार्च : शहरातील मध्यभागी अगदी मुल मार्गालगत नव्याने तयार करण्यात आलेल्या बी-फॅशन प्लाझा शॉपींग मॉल चा येत्या गुढीपाडवा दिनी २२ मार्च २०२३ ला भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे.
गडचिरोली शहरवासीयांनासह जिल्हावासीयांना मुल मार्गावर भव्यदिव्य शॉपींग मॉल होणार असल्याचे कळले मात्र ते कशाचे हे कळले नव्हते. हळूहळू ते बी-फॅशन प्लाझा शॉपींग मॉल असल्याचे कळताच शॉपींग मॉल केव्हा सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र आता ती उत्सुकता संपुष्टात आली असून बुधवार २२ मार्च २०२३ रोजी या भव्यदिव्य शॉपींग मॉल चा शुभारंभ करण्यात येणार असून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडेल असा शॉपींग मॉल असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
या शॉपींग मॉल मध्ये कपड्यांसह फूट वेअर, कॉस्मेटीक वस्तू सुद्धा विक्रीस असणार आहे. या भव्य शॉपींग मॉल मध्ये आता कपड्यांपासून इतरही वस्तू भेटणार असल्याने शहरवासीयांमध्ये उत्सुकता लागलेली आहे. आता लग्न कार्य अथवा इतर कार्यासंबंधीत आवश्यक साहित्य या मॉल मधून मिळत असल्याने एकाचवेळी खरेदी करता येणार आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News updates) (The gdv) (B Fashion Plaza Shopping Mall Gadchiroli grand opening 2023) (Gudhipadwa)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here