– गडचिरोली वनविभाग व रेस्क्यू टीमची कामगिरी
The गडविश्व
गडचिरोली, २० मार्च : चंद्रपूर मार्गावर असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात आज २० मार्च रोजी सकाळच्या सुमारास वाघाचे दर्शन झाल्याने शहरात एकचं खळबळ उडाली होती. दरम्यान सायंकाळच्या सुमारास वनविभाग अनो रेस्क्यू टीमने मोहीम राबवत वाघिणीला जेरबंद केल्याची माहिती पुढे येत आहे.जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली आहे. अशातच गडचिरोली शहरानजीक तसेच शहराच्या काही अंतरावर वाघाचे दर्शन नागरिकांना झाले आहे. मात्र आज २० मार्च रोजी सकाळच्या सुमारास थेट शहरातील मध्यभागी वाघाचे दर्शन झाल्याने एकचं खळबळ उडाली. सदर माहिती शहरात पसरताच बघ्यांची झुंबडच उडाली होती. वनविभागाने चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम पाचारण केले व सायंकाळच्या सुमारास अथक परिश्रमानंतर त्या वाघिणीस जेरबंद करण्यात आले. यावेळी बघ्यांची गर्दी पहावयास मिळाली, वाघिणीसह पिल्ले सुद्धा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती मात्र वाघिणीला जेरबंद करण्यात आले तेव्हा मात्र पिल्ले आढळून आले नाहीत.
थेट शहरात वाघाने प्रवेश केल्याने मात्र आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कुठेही वाघाचे दर्शन होण्याची शक्यता आहे अशी नागरिकांची चर्चा ऐकावयास मिळाली. तर वाघास जेरबंद केल्याने वनविभागाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
(The gadvishva) (The gdv) (Gadchiroli news updates) (Tiger gadchiroli complex)