गडचिरोली : विदर्भ इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकाची राष्ट्रीय उपक्रमात उत्तुंग भरारी

257

The गडविश्व
गडचिरोली, २० मार्च : स्थानिक विदर्भ इंटरनॅशनल स्कूल मधील संगीत शिक्षक प्रणय मेडपल्लीवार यांनी “भारत को जानो” या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. नॉट ईस्ट कल्चरल झोन दिमापुर आसाम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्र, राजस्थान, आसाम इत्यादी राज्यातून कलावंतांनी आपली कला सादर केली. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात वास्तव्य असणाऱ्या प्रणय मेडपल्लीवार या कलावंताने राष्ट्रीय स्तरावर जाऊन आपल्या माय मराठीचे नाव मोठे करत आहे हे उल्लेखनीय आहे. इंटरनॅशनल स्कूल मधील चिमुकल्यांना संगीताचे धडे देत सोबतच ही मोठी गगनभरारी गाठली. या यशाकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका नेहरिका मंदारे यांनी त्यांचे कौतुक केले व भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

(The gadvishva) (The gdv) (gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here