गडचिरोली : चिमुकल्यांनी झाडाला राखी बांधत दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश

170

The गडविश्व
गडचिरोली, ३० ऑगस्ट : येथील विदर्भ इंटरनॅशनल स्कूल, पोदार जम्बो किड्स (Podar Jumbo Kids Gadchiroli) मध्ये पूर्व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांनी झाडाला राखी बांधत निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे.
दैनंदिनी आयुष्यात झाडांचे व निसर्गाचे अनन्य साधारण महत्त्व आहे ही बाब मुलांमधे रुजविण्यासाठी शालेय प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यातून एका वेगळ्या प्रकारच्या रक्षाबंधन कार्यक्रमाची व्याख्या मुलानी समाजासमोर मांडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नेहरिका मंदारे तसचे Co-ordinator समरिन धामाणी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम उत्कृष्टरीत्या पार पाडण्यासाठी pre-primary विभागाच्या शिक्षिका रुतिका मामीडवार, मेघा रोडे, मेघा कोडापे, स्नेहल मेश्राम, हिमानी उपाध्याय, सुजाता उंदिरवाडे, पल्लवी रायपूरे, राजश्री सुर्यवंशी, सुप्रिया कुंभमवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here