The गडविश्व
गडचिरोली, ७ ऑक्टोबर : वनविभागाच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करून नागरिकांमध्ये वन्यजीवांबद्दल जनजागृती करण्याचे काम वन विभागा तर्फे सुरू आहे. अशातच काल रात्रोच्या सुमारास आरमोरी मार्गावरील प्लॅटिनम ज्युब्ली शाळे समोर अजगर साप असल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली असता अजगर सापाला पकडून इतर ठिकाणी सोडून जीवनदान देण्यात आले.
#गडचिरोली : अबब… तब्बल साडेसतरा किलोच्या ११ फूट अजगर सापाला जीवनदान#gadchiroli #gadchirolinews pic.twitter.com/aS2buwCdMN
— THE GADVISHVA (@gadvishva) October 7, 2023
हा साप तब्बल ११ फूट लांब व १७ किलो ५०० ग्राम होता. सर्पमित्रांनी अत्यंत शिताफिने अजगर सापाला पकडले. प्लॅटिनम ज्युबली शाळे कडील परिसर हा शेताला लागून व कठाणी नदी जवळ असल्यामुळे हा साप चुकीने रोड कडे आला होता मात्र नागरिकांच्या मागणीमुळे या सापाला पकडुन दुसऱ्या दिवशी उप वनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनात सोडण्यात आले.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक करिश्मा कवडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, वणपाल श्रीकांत नवघरे, जनबंधू, वनरक्षक भारत राठोड, सर्पमित्र अजय कुकडकर, सौरभ सातपुते, मकसुद सय्यद, पंकज फरकाडे, प्राशिक झाडे, योगेश हजारे, निखिल लडके उपस्थित होते.