‘सर्च’ रुग्णालयात मोफत जनरल सर्जरी कॅम्प

44

The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात डॉ. संदीप शोत्री व सहकारी टिम सांगली/सातारा (General Surgeon) यांच्या नेतृत्वात ०७ ते ०८ जून २०२४ दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत आहे. सर्चद्वारे मागील १८ वर्षापासून दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. ज्या रूग्णांना गर्भाशयातील अंडाशयाच्या गाठी, शरीरावरील गाठी, अपेंडिक्स, हर्निया-हायड्रोसील या प्रकारची लक्षणे असलेल्या आजारांसंबंधित रुग्णांनी ०५ जून २०२४ पूर्वी सर्च रुग्णालयात येउन ऑपरेशनपूर्व तपासणी करुन घ्यावी व या शिबिरासाठी आपले नाव नोंदवून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना शस्त्रक्रियेची सुविधा मिळावी यासाठी चातगाव येथील सर्च रुग्णालयाने मोफत जनरल सर्जरी कॅम्पचे आयोजन केले आहे. ऑपरेशन संबंधित प्रयोगशाळा तपासणी व ऑपरेशन मोफत राहणार आहे, सर्जरीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मेससुविधा मोफत दिल्या जाईल. तरी दिनांक- ०७ ते ०८ जून २०२४ रोजी होणार्‍या जनरल सर्जरी कॅम्प करिता रुग्णांनी सर्च रुग्णालयात येऊन ऑपरेशन पूर्व तपासणी करून सर्जरी करिता आपले नाव नोंदवावे व ऑपरेशन सुविधेचा लाभ करून घ्यावे.
१६ ते ३१ मे २०२४ दरम्यान उन्हाळी सुट्टी असल्यामुळे सर्च रुग्णालय बंद राहणार आहे. १ जून २०२४ पासून रुग्णालय नियमित सुरू राहील याची रुग्णांनी नोंद घ्यावी अशीही माहिती सर्च तर्फे सांगण्यात आली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here