गडचिरोली : दीड लाख रुपये बक्षीस असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास अटक

1460

विविध गुन्ह्यात होता सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ च्या दरम्यान पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास गडचिरोली पोलिसांनी काल २१ एप्रिल रोजी 21/04/2024 रोजी अटक केले. दिलीप मोतीराम पेंदाम (वय ३४) रा. नेलगुंडा ता. भामरागड, जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या जनमिलिशियाचे नाव आहे.
फेब्रुवारी ते मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. काल २१ एप्रिल रोजी उपविभाग भामरागड हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांना भामरागड गावात दिलीप पेंदाम हा संशयितरित्या वावरत असतांना आढळुन आल्याने त्याची अधिक सखोल चौकशी असता तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे तसेच २२ मार्च २०२३ रोजी नेलगुंडा जंगल परिसरात ०१ क्लेमोर व ०२ कुकर बॉम स्फोटके लावुन सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्र व दारुगोळा लुटण्याचे अनुषंगाने उप-पोस्टे लाहेरी येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास काल २१ एप्रिल रोजी रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता असे अधिक तपासात दिसून आले.
दिलीप हा २०२३ मध्ये नेलगुंडा जंगल परिसरात नेलगुंडा – गोंगवाडा व नेलगुंडा – महाकापाडी जाणा­या पायवाटेवर 01 क्लेमोर व 02 कुकुर बॉम स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. व माओवादयांच्या हिंसक कार्यवायांच्या अनुषंगाने इतर दाखल गुन्हयात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने त्याच्या अटकेवर दीड लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 78 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #tcoc #naxalarrest )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here