शेतकरी ओळखपत्राच्या नावाखाली फसवणूक – कृषी विभागाचा इशारा

112

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : शेतकरी नोंदणीसाठी केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक उपक्रमांतर्गत डिजिटल शेतकरी ओळखपत्र (Digital Farmer ID) तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या उपक्रमात कुठल्याही प्रकारचे भौतिक/ऑफलाइन शेतकरी ओळखपत्र अधिकृतपणे मान्य नाही. कोणत्याही संस्थेस असे ओळखपत्र छापण्याची किंवा वितरित करण्याची परवानगी नसतानाही काही सेवा केंद्रे व संस्थांकडून अनधिकृतपणे ही कार्डे शेतकऱ्यांना दिली जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने या प्रकाराला अत्यंत गंभीर मानले असून अशा फसवणूकप्रवृत्तीमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होण्याची तसेच गैरवापर होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.
गडचिरोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. प्रिती हिरळकर यांनीही शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, “शेतकऱ्यांनी अधिकृत डिजिटल ओळखपत्रासाठी केवळ शासकीय माध्यमांवरच विश्वास ठेवावा. अनधिकृतपणे जारी होणाऱ्या शेतकरी ओळखपत्रांना वैधता नाही. शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही फसव्या प्रलोभनाला बळी पडू नये.”
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here