झाडीबोली साहित्याचा उत्सव : ‘झाडीचा खाजा’ काव्यसंग्रहाचे १७ मे रोजी प्रकाशन

65

झाडीबोली साहित्याचा उत्सव : ‘झाडीचा खाजा’ काव्यसंग्रहाचे १७ मे रोजी प्रकाशन
– प्रकाशन सोहळ्यासह कविसंमेलनाचे आयोजन ; साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०७ : गावाकडच्या बोलीभाषेतील साहित्याला व्यापक ओळख मिळावी आणि स्थानिक संस्कृतीचा गौरव व्हावा, या उद्देशाने साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल लिखित “झाडीचा खाजा” या झाडीबोली काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. १७ मे रोजी सकाळी ११ वाजता महादेवगड अरततोंडी येथील गट ग्रामपंचायत सभागृहात पार पडणार आहे.
या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन नाट्यलेखक, दिग्दर्शक व नाट्यकलावंत सदानंद बोरकर यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरततोंडी गट ग्रामपंचायतीचे सरपंच विजय तुलावी राहणार आहेत.
दीपप्रज्वलन प्रसिद्ध साहित्यिक व आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम यांच्या हस्ते होणार असून, भाष्यकार म्हणून डॉ. धनराज खानोलकर तसेच समीक्षक, नाट्यकलावंत प्रा. डॉ. राजकुमार मुसणे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय वासुदेव कोल्हे आणि भाऊराव पत्रे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी २ वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, ज्येष्ठ हास्यकवी एकनाथ बुध्दे हे कविसंमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
झाडीबोली साहित्याचा वारसा जपणाऱ्या या कार्यक्रमास साहित्यप्रेमी, कवी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संगीता संतोष ठलाल यांनी केले आहे. कविसंमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी ७८२१८१६४८५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here