देसाईगंज काँग्रेसमध्ये स्फोटक हालचाल – २०० युवकांसह धडाडीचा नेता पक्ष सोडणार?

122

देसाईगंज काँग्रेसमध्ये स्फोटक हालचाल – २०० युवकांसह धडाडीचा नेता पक्ष सोडणार?
– ‘ या’ पक्षाकडे जाण्याच्या चर्चेने खळबळ, शहरभर एकच प्रश्न – “तो कोण?”
The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, दि. ०८ : देसाईगंजच्या राजकारणात सध्या थरार निर्माण झाला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि गोटबाजीने एक लोकप्रिय, संघर्षशील आणि जनतेशी घट्ट नातं असलेला युवा नेता प्रचंड नाराज झाला असून, तो राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याच्या तयारीत आहे, अशी स्फोटक चर्चा शहरभर जोरदार रंगली आहे.
या युवानेत्यामागे २०० हून अधिक निष्ठावंत युवक कार्यकर्त्यांची फौज उभी असल्याने देसाईगंज काँग्रेसमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल लागली आहे.
अलीकडेच वडसा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जेसाभाऊ मोटवानी आणि ॲड. संजय गुरु यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. त्या प्रवेशाने काँग्रेसच्या गोटात मोठं वादळ उठलं होतं. आणि आता या युवा नेत्याच्या संभाव्य जाण्याच्या चर्चेने तर पक्षाच्या तंबूत गोंधळ माजवला आहे.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील काही गटांकडून “वरदहस्त आणि पैशाच्या राजकारणा”चा खेळ सुरू असल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करून नवख्या चेहऱ्यांना महत्त्व दिलं जातंय, असा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
दरम्यान, हा युवा नेता गेल्या काही वर्षांत शेतकरी, बेरोजगार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेला चेहरा म्हणून ओळखला जातो.
पक्षासाठी स्वतःच्या खर्चाने कार्यक्रम राबवणे, आंदोलने उभी करणे, आणि प्रत्येक लढ्यात आघाडी घेणे हे त्याचं वैशिष्ट्य. पण आता त्याच्याच विरोधात दबाव आणि अपप्रचाराचं राजकारण सुरू झाल्याने तो प्रचंड अस्वस्थ आहे.
शहरात, गल्लीबोळांत, चहाच्या टपरींपर्यंत आणि सोशल मीडियावर सध्या एकच प्रश्न घुमतोय -“तो कोण?” “तो खरंच जातोय का?”
या प्रश्नांनी देसाईगंजचं राजकारण अक्षरशः पेटलं असून त्याच्याविषयी असलेली जनतेची आपुलकी, ग्रामीण भागातली पकड आणि युवकांमधील लोकप्रियता पाहता, काँग्रेसमधून त्याच्या संभाव्य बाहेर पडण्याने गाव ते शहर स्तरावर काँग्रेसचा पाया हादरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या युवानेत्यामागे उभे असलेले २०० हून अधिक कार्यकर्ते स्पष्ट म्हणतात
“आमचा आवाज दाबणाऱ्यांसोबत आम्ही नाही,आमचं राजकारण आता नव्या दिशेने जाणार”
जर पक्ष नेतृत्वाने तातडीने हस्तक्षेप केला नाही, तर देसाईगंज काँग्रेसचा गड कोसळण्याची शक्यता आता नाकारता येत नाही.

राजकीय वर्तुळात एकच चर्चा

हा संघर्षातून घडलेला, प्रामाणिक आणि प्रभावी युवानेता खरोखरच काँग्रेस सोडणार का? की ही फक्त अफवांची ठिणगी आहे, जी पुढच्या काही दिवसांत मोठ्या राजकीय स्फोटात रूपांतरित होणार आहे?

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #DesaiganjPolitics #CongressCrisis #YouthLeader #NCPMove #PoliticalStorm #GadchiroliNews #BreakingPoliticalNews #MaharashtraPolitics #LocalNews #PoliticalShift #WhoIsHe #CongressExit #YouthPower #PoliticalBuzz #HotTopic #NCPEntry #LeadershipCrisis #GrassrootPolitics #ViralNews #PoliticalTremor

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here