सिरोंच्यात पहाटे भूकंपाचा धक्का; अहेरी-नागेपल्लीपर्यंत जाणवली सौम्य कंपने

39

सिरोंच्यात पहाटे भूकंपाचा धक्का; अहेरी-नागेपल्लीपर्यंत जाणवली सौम्य कंपने
– ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद; कोणतीही हानी नाही
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३ : जिल्ह्यातील नागरिकांची पहाट आज भूकंपाच्या सौम्य धक्क्याने झाली. गुरुवारी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून, त्याचे केंद्र सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी तसेच नागेपल्ली परिसरातही जाणवले. पहाटेची वेळ असल्याने अनेक नागरिकांना काही काळ कंपने जाणवल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर स्थानिक प्रशासनाने परिस्थितीची माहिती घेण्यास सुरुवात केली असून, विविध भागांतील संभाव्य नुकसानीची पाहणी केली जात आहे. सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

दरम्यान, भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, शांतता राखावी आणि आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. तसेच भूकंपासंदर्भातील अफवा अथवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Sironcha #Earthquake #GadchiroliNews #SironchaEarthquake #Aheri #Nagapalli #EarthquakeNews #MaharashtraNews #BreakingNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here