धानोरा जिल्हा परिषद हायस्कूलचा दहावी निकाल 98.01 टक्के
– रुचिका सहारे विद्यालयात प्रथम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०९ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च 2026 च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा यांनी यंदाही उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत 98.01 टक्के निकाल नोंदविला आहे. शाळेच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विद्यालयातील एकूण 102 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 22 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, 47 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 29 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये कु. रुचिका हंसराज सहारे हिने 94 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. आदर्श तुषार लेनगुरे याने 90.40 टक्के गुणांसह द्वितीय तर कु. समीक्षा घनश्याम सोनुले हिने 86.60 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच शंतनू केवलदास लाकडे (84.60%), कु. सानिका सुनील चौधरी (84.40%), कु. भारती लक्ष्मण गावडे (82.20%), कु. प्रतिज्ञा यशवंत होळी (81.80%), कु. संगिनी प्रल्हाद वाडगुरे (81.40%), अभय दीपक उसेंडी (81.20%), कु. अक्षरा दादाजी पोवरे (81%), क्रिष्णा सूर्यकांत कोमले (80.80%), करणकुमार अमरलाल औरसा (80.80%), भावेश राकेश खरवडे (79.80%), कु. जान्हवी राजेंद्र मडावी (79.60%), रोहित बबन उईके (79.60%), कु. किंजल रविंद्र गुरनुले (77.80%), उत्कर्ष महेश सहारे (77.80%), कु. नंदिनी नरेश उसेंडी (77.20%), अंकुश चिन्नू पदा (76.40%), साहील अरुण शेंडे (75.80%), विपस्या रितेश मशाखेत्री (75.60%) तसेच इब्राहिम हरमित टेकाम (75.40%) यांनी प्रावीण्य श्रेणीत यश संपादन केले.
या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्रीमती हेमलता परसा, मुख्याध्यापक व्ही. एम. सुरजुसे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. वेणूताई मशाखेत्री, उपाध्यक्ष जमीर कुरेशी तसेच समिती सदस्य, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.














