धानोरा : त्या पुलावरील लोखंडी सळाखी वर निघाल्या ; अपघाताची शक्यता

206

– प्रशासनाचे दुर्लक्ष, जनता त्रस्त
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १२ ऑगस्ट : तालुक्यातील रांगी ते निमगाव मार्गावरील बोरी फाट्यावरील नाल्यावर बांधण्यात आलेल्या पूल रपट्टा असुन सध्या फुटला आहे. त्या पुलावरील सिमेंट निघाला असल्याने लोखंडी सळाखी वर आल्याने वाहनधारक, शेतकरी, शेतमजूर, शालेय विद्यार्थी,अशा सर्वांना धोकादायक असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने नाममात्र डागडुजी करून फक्त दुरुस्ती केल्याचा दिखावा केल्या जाते. सिमेंट वाहून गेल्याने दरवर्षी सळाखी बाहेर पडत असल्याचे यावर योग्य कायमस्वरूपी उपाय शोधून नव्याने बांधकाम करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
धानोरा तालुक्यातील रांगी पासून निमगाव मार्गावरील २ कि.मी.अंतरावर बोरी गावाला जाणारा रस्ता आहे. त्यात निमगांव मार्गावर एक आणि बोरी मार्गावर दुसरा असे दोन पुलाचे बांधकाम १५ ते २० वर्षापूर्वी करण्यात आले. ते सुद्धा रस्त्याच्या बरोबरीत जसे जुन्या काळातील रपट्या प्रमाणे. मात्र चालु वर्षात पाहिजे त्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली नाही तरीही दोन्ही पुलाची मोठी दूरदर्शा झाली आहे. पुलावरील प्लास्टर पूर्णपणे फुटलेले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. पुलावरील लोखंडी साखळी बाहेर निघाले असल्याने प्रवाशांना ते अपघाताचे आमंत्रण देत आहे . यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत मात्र याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे .
भारताला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करिता आहे. जिल्हाचा विकास झाल्याच्या गोष्टी केल्या जातात. मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. पुलाच्या वर आलेल्या लोखंडी सळाखी व पुलावर पडलेल्या खड्यामुळे अपघाताची शक्‍यता बळावली असल्याने शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाची फक्त दुरुस्ती करण्यापेक्षा नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर दोन्ही पुलावरून पावसाळ्यात दरवर्षी पाणी वाहत असते. पुलावर ३ ते ४ फुट पाणी वाहत असते. तरीही पुलावरील पाणी उडवत व स्वताचा जीव धोक्यात घालून या परिसरातील लोक पुलावरुण प्रवास करतात. या मार्गावरून शेतकरी, शेतमजूर सायकलस्वार, दुचाकी-चारचाकी वाहने तसेच बैलबंडी इत्यादी वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मागील दोन वर्षापूर्वी या दोन्ही पुलाची डागडुजी करण्यात आली तरीही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलावरील गिट्टी निघून लोखंडी राळ बाहेर निघाले आहेत सध्या या पुलावरून प्रवास करणे धोक्याचे आहे. मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. लोकप्रतिनिधींना सुद्धा याकडे लक्ष द्यायला मुळीच वेळ नाही. नाममात्र पुलाची डागडुजी केली जाते त्यातही बांधकामात सिमेंट व इतर साहित्याचा अत्यल्प वापर करून सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पुराच्या पाण्याने सिद्ध केले. कंत्राटदाराकडून अधिकाऱ्यांना चिरीमिरी मिळत असल्याने सदर बांधकामाची कोणतीही चौकशी न करता देयके मंजूर केल्या जाते त्याचा भुर्दंड शासनाला सोसावा लागत आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी च्या दुर्लक्षित पणामुळे सदर पुलाची दूरदर्शा झाल्याची टीका परिसरातील जनतेकडून केल्या जात आहे. या पुलावरून विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी नागरिक यांना जावे लागत असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाची डागडुजी त्वरित करण्यात यावी अशी मागणी लोकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here