‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाअंतर्गत आरमोरी नगरपरिषदेच्या वतीने भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी

164

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान कार्यक्रम
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, १२ ऑगस्ट : आरमोरी नगरपरिषद कार्यालय अंतर्गत “मेरी माटी मेरा देश “अभियान राबविण्यात येणार असून १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाची रेलचेल आयोजित करण्यात आलेली आहे. हा अभियान देशभरात राबविण्यात येत असला तरी आरमोरी नगर परिषदेने विविध कार्यक्रमाची मेजवानी घेऊन अभियान वेगळ्या पद्धतीने राबवण्याचा विडा उचललेला आहे.
१३ ऑगस्ट ला सकाळी ८.१५. वाजता ध्वजारोहण, ९.०० वा. शिलाफलक अनावरण, १०.०० वाजता पंचप्रण शपथ, ११.०० वा. वसुधा वंदन (वृक्षारोपण) व दुपारी एक वाजता स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन, वेशभूषा स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे.
तसेच १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी झेंडा विक्री नगरपरिषद कार्यालय येथे सुरू आहे. तरी अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे व सहकार्य करावे असे आवाहन न.प मुख्याधिकारी दोनाडकर, न.प.अध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदर पंजवाणी, सभापती भारत बावणथडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here