– ६१ दिव्यांग विद्यार्थ्यांची केली तपासणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ४ फेब्रुवारी : जिल्हा परिषद आणि जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली तसेच मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समावेशित शिक्षण उपक्रमांअतर्गत बौद्धिक दृष्ट्या अक्षम विदयार्थ्यांसाठी स्वावलंबन पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्ड देण्यासाठी तपासणी व निदान विशेष मोहिम कार्यक्रमांतर्गत बुद्धीगुणांक चाचणी शिबिर २ फेब्रुवारी २०२३ ला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा येथे आणि जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा कारवाफा येथे ०३ फेब्रुवारी २०२३ ला दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ६१ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
शिबिराला प्रामुख्याने अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय जठार, संवर्ग विकास अधिकारी सतिश टिचकुले, अतिरिक्त पं. स.धानोराचे संवर्ग विकास अधिकारी कोमलवार, गटशिक्षणाधिकारी आरवेली, वैद्यकीय अधिक्षक ग्रा. रु. धानोरा गजबे, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर आखाडे, शिक्षण विस्तार अधिकारी वैद्य, शिक्षण विस्तार अधिकारी मेश्राम, मानसोपचार तज्ञ श्रद्धा गणोरकर, संजय पुराम, उमेश कुळमेथे, जिल्हा समन्वयक हुकरे, नांदेकर आदी उपस्थित होते.
अजय खैरकर उपस्थित मान्यवरांनी विदयार्थ्यांशी आणि पालकांशी हितगुज साधून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केजीबीवी मुख्याध्यापिका कु· कुळमेथे, जि.प. उच्च प्राथ. शाळा कारवाफा येथील मुख्याध्यापिका. कु· पोरेटी, श्री. ब्राम्हणकर विषयतज्ञ,आकाश चांदेकर,नाजूक पाटिल, किरंगे यांच्यासह शाळांचे शिक्षक व गटसाधन केंद्रातील सहारे, ब्राम्हणवाडे, कु. दुग्गा, कु. थाईत, कु. मडावी यांनी सहकार्य केले.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Vani Jayaram) (Everton vs Arsenal) (Man United vs Crystal Palace) (Wolves vs Liverpool) (JEE Mains Answer Key 2023) (Chelsea)