धानोरा : येरकड परिसरातील शेतकऱ्यांचा धान्याच्या विक्रीकरिता रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा

437

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ९ फेब्रुवारी : आदिवासी विकास महामंडळ नाशिक अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली धानोरा उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत धानोरा तालुक्यातील येरकड परिसरातील आधारभुत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यास विलंब होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी धान्याच्या विक्रीकरिता रस्ता रोको आंदोलनाचा इशारा निवेदनातून तहसीलदार धानोरा यांना देण्यात आला आहे.
धान्याची शासनाकडून टीडीसी खरेदी करित आहे .परंतु शासनाकडून १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत धान्य खरेदीची अंतिम मुदत असून त्यांच्याकडे शासनाने ठरविलेल्या धान्य खरेदीचे उद्दिष्ट जेमतेम संपत आलेला आहे व अजून पर्यंत धानोरा तालुक्यातील अंदाजे २८०० शेतकरी धान्य विक्रीपासून वंचित आहेत त्या कारणाने शेतकऱ्यांना बँकेचा पीक कर्ज चुकविता येणार नाही. कुंटुंबाचा आर्थिक भार सोसता येनार नाही, कौटुंबिक जीवन सुद्धा ढासळु शकतो.
शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील धान्य शासन घेणार कि नाही अशी शंका निर्माण झालेली असून येरकड येथील धान खरेदी केंद्र सुरु नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना धान इतर खरेदी केंद्रात विक्री करावे लागत आहे. तेथे केंद्रप्रमुख धान घेण्यास टाळाटाळ करित असल्याने त्यातच शासनाचे उद्दिष्टे पुर्ण होत आहे तसेच मुदतही १५ फेब्रुवारी २०२३ असल्यामुळे या परिस्थितीत शेतकऱ्यांचे धान्य वेळेत करण्यात यावे याकरिता शासनाने येरकड परिसरातील शेतकऱ्यांच्ये धान्य लवकरात लवकर खरेदी करावे व त्यासाठी आवश्यक उद्दिष्टे वाढवून द्यावे उद्दिष्टे आणि खरेदी ची मुदत १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत न वाढल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
निवेदक देताना लालाजी जांगदुर्ग, विनोद पदा, देवनाथ कुमोठी, आनंदराव पदा, अरुण टेंभुर्णे, स्वप्निल कोडाप, रुपेश सहारे, शंकर‌ कोडाप, कोतु कुमोटी, शिवराम पदा, देवनाथ कुमोटी, वत्सला नरोटे, मानकीबाई वडे,देवराव पदा, वासुदेव आतला, मनिराम मडावी, हरसिंग कल्लो, करूगुसु जांगदुर्ग, मोतीराम आतला, शालिकराव आतला, देवाजी वडे, तुळशीराम पदा, देवराव उसेंडी, शामराव उसेंडी, माधव कुमोटी, अंतराम तुलावी, कुलबत्ती जांगदुर्वे, प्रदीप सहारे, सिद्धार्थ सहारे, लालाजी जाग धुर्वे. उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv) (Dhanora Yerkad)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here