देसाईगंज : झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत इसम आढळला

173

The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, ९ फेब्रुवारी : तालुक्यातील कुरुड येथे झाडाला एक इसम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. घनश्याम खोब्रागडे (५५) रा. कुरुड असे सदर इसमाचे नाव आहे.
शेतीला पाणी देण्याकरिता काही नागरिक सकाळच्या सुमारास गेले असता त्यांना एका झाडाला एक इसम लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने जवळ जावून पाहिले असता घनश्याम खोब्रागडे हा इसम गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबतची माहिती तात्काळ पोलिस पाटील मंगेश मडावी यांना देण्यात आली तसेच याप्रकरणी मर्ग नोंदविण्यात आल्याची माहिती आहे.
मात्र सदर इसमाच्या मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here