गडचिरोली : देवेंद्र लांजेवार यांची क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराकरिता निवड

233

महाराष्ट्र विधानपरिषद थेट प्रक्षेपण (अर्थसंकल्पीय अधिवेशन, फेब्रुवारी-मार्च २०२३)

– शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड
– ३ जानेवारी २०२३ रोजी पुरस्कार वितरण
The गडविश्व
गडचिरोली, ३० डिसेंबर : जिल्ह्यातील पंचायत समिती धानोरा अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगांव येथील शिक्षक देवेंद्र जगन्नाथ लांजेवार यांची क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२१-२२ साठी प्राथमिक शिक्षक प्रवर्गातून निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम ३ जानेवारी, २०२३ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी मुंबई येथे होणार आहे.
समाजाची नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन २०२१-२२ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे त्यात गडचिरोली जिल्ह्यातील चार शिक्षकांचा समावेश असून प्राथमिक शिक्षक प्रवर्गातून पंचायत समिती धानोरा अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगांव येथील शिक्षक देवेंद्र जगन्नाथ लांजेवार, माध्यमिक प्रवर्गातून कन्हेरी येथील प्रियंका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विवेकानंद वातुजी हुलके, तसेच आदिवासी क्षेत्रातील सेवेसाठी एटापल्ली तालुक्यातील जारावंडीच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळेवरील शिक्षक मांतप्पा चिन्नी बेडके आणि भामरागड तालुक्यातील सोपनगुडा येथील शिक्षक विनीत बंडू पद्मावार यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येणार आहे. या पुरस्काराची रक्कम १० हजार रुपये आहे. तसेच राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रुपये १ लाख रुपये अदा करण्यात येते.
सन २०२१-२२ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी ०१ सप्टेंबर, २०२२ रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे ०५ सप्टेंबर, २०२२ च्या पत्रान्वये शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली. त्यानुसार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

प्रवर्ग निहाय पुरस्कार

प्राथमिक ३८, माध्यमिक ३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) १८, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार ८, विशेष शिक्षक कला/क्रीडा (१+१) 2, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक 1, स्काऊट/गाईड (१+१) २ अश्या एकूण १०८ शिक्षकांची पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Tom Cruise) (China Covid) (World Cup) (PSG) ( Devendr Lanjewar) (Radhika Merchant) ( CBSE Date Sheet 2023) ( PSG) (Guru Gobind Singh Jayanti) (Benjamin Netanyahu) (Narendra Modi) ( nimgao) (jarvandi) (Etapalli) (Bhamragadh) (sopanguda) (Devendra Lanjewar selected for Krantijyoti Savitrimai Phule State Teacher Merit Award)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here