धान खरेदी, कृषी गोदाम आणि जंगलावरील उद्योग सुरू करा : आमदार भाई जयंत पाटील

350

– गडचिरोलीच्या प्रश्नांवर विधान परिषदेत चर्चा
The गडविश्व
गडचिरोली, २९ डिसेंबर : जिल्हा हा जंगल व्याप्त जिल्हा असल्याने येथील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी जंगलांचे रक्षण करुन त्यावर आधारित उद्योग शासनाने सुरू करावेत. त्यासाठी भरीव तरतूद करण्यात यावी अशी मागणी शेकापचे आमदार भाई जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली.
आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनुशेषावरील २६० नियमान्वये चर्चे दरम्यान आमदार भाई जयंत पाटील म्हणाले, पुर्व विदर्भात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र धान खरेदी केंद्रे वेळेत सुरू होत नाही. साठवणुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने शासनाच्या पैशांनी खरेदी केलेले धान्य सडून कोट्यवधींचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात मुबलक प्रमाणात धान साठवणूक गोदामांचे बांधकाम करण्याची आवश्यकता असून शासनाने निधी उपलब्ध करून द्यावे. जंगलावर आधारित ब्रिकेटींग उद्योग सुरू करण्यासाठीही शासनाने पुढाकार घेण्याची मागणीही आमदार भाई जयंत पाटील यांनी केली.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Salman Khan) (David Warner) (Steve Smith) (Sandeep Sharma) ( Chelsea vs Bournemouth ) (Road Accident) (MLA Jayant Patil)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here