देसाईगंज : रेल्वेच्या धडकेत इसमाचा जागीच मृत्यू
– फाटकाजवळच्या घटनेने परिसरात खळबळ
The गडविश्व
देसाईगंज, दि. २५ : शहरातील रेल्वे फाटकाजवळ २५ नोव्हेंबर रोजी दुपारी घडलेल्या भीषण रेल्वे अपघातात इसमाचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या रेल्वेच्या धडकेत तो जागीच ठार झाला असून या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत्यू झालेल्या इसमाची ओळख रोशन किसन सहारे (रा. रावणवाडी) अशी झाल्याचे कळते. तो नगरपरिषदेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असल्याचे कळते. रोजच्या कामानिमित्त तो त्या भागातून जात असताना ही घटना घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले असून देसाईगंज पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice












