– तहसिलदार यांच्या मार्फत पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता. प्रा / धानोरा, १४ फेब्रुवारी : येथील प्रभाग क्रमांक १ विद्यानगरच्या मागे एक क्रीडा मैदान आहे परंतु ते अविकसित आहे त्याला विकसित करुन क्रिडांगण संकुल तयार करण्याची मागणी येथील नागरिकांनी तहसिलदार धानोरा यांच्या मार्फत पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातुन केली आहे.
धानोरा येथील प्रभाग क्रमांक १ विद्यानगर येथे एक क्रिडा मैदान आहे. ते खेळण्या व्यतिरिक्त इतर कामासाठी वापरला जातो. हे मैदान बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस इत्यादी खेळासाठी इंदोर स्टेडियम साठी आदर्श आहे. परंतु त्याला पाहिजे त्या प्रमाणात विकसित केलेले नाही. गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यामध्ये क्रीडा संकुल असुन पायाभूत सुविधा आहेत. धानोरा येथील क्रीडा संकुल मधे पायाभूत सुविधा निर्माण केल्यास या भागातील विद्यार्थ्यांना, खेळाडूना, तरुणांना, सरकारी अधिकारी, व्यापारी आणि खेळात रस असलेल्या प्रत्येकाला फायदा होईल. अशा क्रीडा संकुलाची धानोरा येथे खूप गरज आहे. कारण आपण बसून जीवन जगताना काही शारीरिक हालचाली करण्यासाठी क्रिंडागणाची गरज आहे त्यामुळे धानोरा तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उपलब्ध करून द्यावे आणि विद्यानगर येथील क्रीडागंणाला विकसित करण्याची मागणी येथील मिलिंद मेश्राम, अमित मेश्राम, अक्षय सहारे, संकेत मशाखेत्री, यांनी तहसीलदार धानोरा तहसील कार्यालय यांच्या मार्फतीने पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून केली आहे.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Valentine’s Day gifts) (Valentine’s Day) (PSG vs Bayern) (Liverpool vs Everton) (Super Bowl) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (Sudhir Mungantiwar)