७ क्विंटल मोहफुलाचा सडवा नष्ट

179

-चांदाळा, अलोणी जंगलपरिसरातील कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, १४ फेब्रुवारी : तालुक्यातील चांदाळा व अलोणी जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून जवळपास ७ क्विंटल मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कारवाई मुक्तिपथ व गावसंघटनेने संयुक्तरित्या केली.
चांदाळा व अलोणी येथे अवैध दारूविक्री केली जाते. या गावातील विक्रेत्यांकडे परिसरातील मद्यपींची दररोज गर्दी असते. तसेच गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह बोदली, बाम्हणी, मेंढा, खरपुंडी आदी गावांतील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. जंगलपरिसरात ठिकठिकाणी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळताच अहिंसक कृती करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. त्यानुसार गावसंघटना व मुक्तिपथ तालुका चमूने चांदाळा व अलोणी जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली. दरम्यान विविध ठिकाणी आढळून आलेला ७ क्विंटल मोहफुलाच सडवा नष्ट करण्यात आला.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Valentine’s Day gifts) (Valentine’s Day) (PSG vs Bayern) (Liverpool vs Everton) (Super Bowl) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (Sudhir Mungantiwar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here