शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे संविधान दिन साजरा

102

The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा (चेतन गहाने) दि. २६ : स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे मंगळावर २६ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राध्यापक कालिदास सोरते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून एम.सी.व्ही.सी. विभागाचे प्रा.रमेश मानागडे, प्रा.विवेक गलबले, वरिष्ठ लिपिक अनिल बांबोळे हे उपस्थित होते .
यावेळी विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी संविधानाची शपथ घेतली व भारतीय संविधानाचे महत्व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.कालिदास सोरते यांनी पटवून दिले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे प्रा.मनोज सराटे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गुरुदास शेंडे तर आभारप प्रा.स्वप्नील खेवले यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी तसेच प्रा.मुनेश्वर राऊत, रुपेश भोयर, अलाम , ओमप्रकाश कुथे, प्राध्यापिका उरकुडे, दरवडे, शिवा भोयर, अक्षय देशमुख यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here