The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २७ : तालुक्यातील ग्रामपंचायत रांगी येथे २६ नोव्हेंबर २०२४ ला ग्राम संविधान दिन सरपंचा सौ.फालेश्वरी प्रदिप गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नुरज हलामी उपसरपंच, रामचंद्र काटेंगे पो.पा., मकरंद बांबोळे ग्रा. पं. अधिकारी, राकेश कोराम, सौ. वच्यला हलामी, सौ. विद्याताई कपाट ग्रामपंचायत सदस्य.रांगी, दिलीप काटेंगे, ल अवसू नैताम, कामेश काटेंगे तसेच नामदेव बैस व सर्व ग्राम पंचायत येथील कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन नितीन कावळे यांनी केले तर प्रास्ताविकामध्ये मकरंद बांबोळे ग्राम पंचायत अधिकारी यांनी संविधान दिनाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
