एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे…

64

– वर्षाताई मोरे यांचे अंबाबाईकडे साकडे
The गडविश्व
आरमोरी (चेतन गहाने) दि. २६ : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला.यात महायुतीला बहुमत मिळाले. मात्र अद्याप शपथविधी व खातेवाटप व्हायचे असल्याने मुख्यमंत्री कोण होणार याकडे राज्याचे लक्ष लागले असताना आरमोरी विधानसभा संपर्कप्रमुख वर्षाताई मोरे यांनी परत एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे याकरिता आई अंबाबाईकडे साकडे घातलेले आहे.
सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत त्याच्यात परत एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असे कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत राज्याच्या विकासात भर टाकली, तसेच विविध योजनेची अंमलबजावणी करून महिला,पुरुष तसेच शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला असल्याने पुढेही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावे अशी मागणी राज्यातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here