स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात काँग्रेस आक्रमक; महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

80

स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात काँग्रेस आक्रमक; महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा
– वाढती वीजबिले कमी करण्याची मागणी, निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
चामोर्शी, दि. ०३ : स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी चामोर्शी येथील महावितरण वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, वाढती वीजबिले कमी करावीत आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस व NSUI यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले.
मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आणि वाढत्या वीजबिलांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणाचा निषेध केला. नागरिकांवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा जनतेच्या पाठिंब्याने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी दिला.
मोर्चानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपकार्यकारी अभियंता देवगडे यांना निवेदन सादर करून स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करणे, वाढत्या वीजबिलांवर नियंत्रण आणणे तसेच वीज ग्राहकांच्या विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. निवेदनातील मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठवून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता देवगडे यांनी दिले.
मोर्चात माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हा उपाध्यक्ष निकेश गद्देवार, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, सातपुते सर, NSUI चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोंगले, शहराध्यक्ष विलास चीचघरे, विजय लाड, प्रेमानंद कोवासे, हरबाजी मोरे, अमर मोगरे, तेजस कोंडेकर, सुभाष कोठारे, आचल चलकलवार, ओमप्रकाश चौधरी, नेहा आभारे, संजय बुरांडे, पीपलदास सोयाम, जावेद खान यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर व नागरिक सहभागी झाले होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chamorshinews #localnews #smart

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here