गडचिरोली-चिमूर लोकसभेकरीता काँग्रेसचा उमेदवार ठरला, भाजपकडून अजूनही सस्पेंस

1043

-डॉ.नामदेव किरसान काँग्रेसचे उमेदवार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : देशभरात २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीत त्या त्या लोकसभा क्षेत्राकरीता आपला उमेदवार निवडणे विविध पक्षांतर्फे सुरू आहे. अशातच महाराष्ट्रातील गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राकरीता निवडणुका जाहीर होऊनही उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. तर आता इंडिया आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला व उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुती तर्फे मात्र अद्यापही सस्पेंस ठेवण्यात आला असून उमेदवारी कोणाला मिळेल याकडे लक्ष लागले आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र हा मोठा असल्याने या क्षेत्रातील उमेदवारीकरिता काँग्रेसकडून डॉ. नामदेव उसेंडी व डॉ.नामदेव किरसान यांच्या नावाची चर्चा होती तर भाजपतर्फे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्यासह राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम तसेच डॉ.मिलिंद नरोटे यांच्या नावाची चर्चा होती. इंडिया आघाडीकडून डॉ. नामदेव किरसान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असला तरी तरी महायुती कडून अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आली नसल्याने येथील उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत सस्पेंस निर्माण झाला आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #namdeokirsan #congressmaharashtra #loksabhaelection2024 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here