The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित सर्च रुग्णालयामध्ये सन १९८८ पासून पद्मश्री डॉ. अभय बंग व राणी बंग जिल्ह्यातील आदिवासी रुग्णांसाठी रुग्ण सेवा देत आहेत. समाजातील शेवटच्या व्यक्तिपर्यंत रुग्णसेवा देणे आणि आरोग्य स्वराज्य निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवून सर्च रुग्णालय विविध सोयी सुविधा देण्याचे कार्य करीत आहे. बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, मानसिक आरोग्य विभाग, फिजिओथेरपी विभाग, लहान मुलांचे मेंदूविकार व लकवा पुनर्वसन केंद्र, माफक दरात रुग्णवाहिका, नियोजित विशेषज्ञ ओपीडी (मुंबई व नागपूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर्स) प्रयोगशाळा, एक्स-रे, ई.सी.जी, २डी ईको, टि.एम.टि तपासणी या सर्व सोयी सुविधांनी सर्च रुग्णालय उत्कृष्ट रुग्णसेवा प्रदान करीत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अधिका-अधिक रुग्णांना सर्च रुग्णालयातर्फे रुग्णसेवा पुरविण्याच्या ध्येयाने विशेष आर्थिक सवलती देण्यात येत आहे. सर्च रुग्णालयातील सेवांचे व औषधांचे दर अन्यत्र खाजगी वैद्यकीय सेवेच्या दरांपेक्षा कमी आहेत, त्यातही गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांना कमी दरात सेवा देण्यात येत आहे. धानोरा व एटापल्ली तालुक्यातील आदिवासी रुग्णांना अतिशय कमी दरात सेवा तसेच मोबाइल मेडिकल यूनिट सर्च (एम.एम.यू) ने रेफर केलेल्या रुग्णांना अत्यंत कमी दरात सेवा तसेच मणक्याचे रुग्ण यांना कमी दरात सेवा देण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांना कमी दरात सेवा सुविधा
१) बीपीएल/ राशन कार्ड/ आधारकार्ड असल्यास रुग्णालयाच्या रजिस्ट्रेशन विभागा मध्ये नाव नोंदणी करताना द्यावे. रुग्णाकडील बीपीएल/ राशन कार्ड/ आधारकार्ड असणार्या रुग्णांना ओपीडी तपासणी (नोंदणी) फी मध्ये ५०% सवलत राहतील.
२) ओपीडी मध्ये प्रयोगशाळा तपासणी फी १००% राहतील.(सर्च प्रयोगशाळेतील दर बाहेरील दरांपेक्षा कमी आहेत )
३) आंतररुग्ण विभागामध्ये रुग्ण भरतीच्या वेळेस एकाच वेळेस २०० रुपये आकारण्यात येईल , त्यानंतरच्या लॅबच्या तपासण्या ,बेड चार्जेस ,औषधी हे मोफत राहतील. (अपवादात्मक दवाखान्यात उपलब्ध नसलेल्या औषधी १००% चार्जेस राहील)
४) सर्च बाहेरील इतर तपासणी ( CT SCAN, Sonography, MRI , IVP, TFT etc ) चे सवलतीच्या दरात चार्जेस राहतील.
५) मोफत सर्जरी खर्च ( सुचर मटेरियल ,ओटी मध्ये वापरण्यात येणारे मशीन, मेडिसिन, डॉक्टर खर्च, भूलतज्ञ खर्च व इतर १००% मोफत राहतील.)
६) इमर्जन्सी रुग्णांना दवाखान्यातून रेफर केल्यास १००% मोफत राहतील. (गडचिरोली किंवा नागपुर शासकीय रुग्णालय)
७) रुग्ण भरती झाल्यावर सुट्टी होई पर्यंत रुग्ण व एक नातेवाईक यांना संपूर्ण मध्ये मेस सुविधा १००% मोफत राहतील
८) Blood transfusion १००% मोफत राहील. बल्ड डोनरची व्यवस्था रूग्णाला करावी लागेल.
धानोरा व एटापल्ली तालुक्यातील आदिवासी रुग्ण तसेच मोबाइल मेडिकल यूनिट सर्च (MMU/ ASHA) ने रेफर केलेल्या रुग्णांना अत्यंत कमी दरात रुग्ण सेवा सुरू करण्यात आली आहे.
१) रजिस्ट्रेशन फी मध्ये ५०% चार्जेस राहतील.
२)ओपीडी मध्ये प्रयोगशाळा तपासणी , ECG, व Xray , TMT, 2D echo तपासणी ५०% सवलतीच्या दरात राहतील.
३) ओपीडी मध्ये डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी (Prescription) मध्ये- ५०% सूट राहतील.
४) सर्जरी शुल्क १००% मोफत राहतील.
५) आयपीडी मधील सेवा सवलतीच्या दरात राहतील.
६) रुग्णभरती वेळेस १०० रुपये आकारण्यात येतील. सर्च बाहेरील इतर तपासणी ( CT SCAN ,Sonography, MRI , IVP, TFT etc ) हे १००% मोफत राहतील.
७) MRI तपासणी शूल्क , स्पाइन ऑपरेशन , औषधी हे सवलतीच्या १००% मोफत राहतील .MRI सुविधा ही त्याच रुग्णांना राहतील जे रुग्णालयाच्या एकाच वाहनाने जाण्यास तयार असेल. ८ ते १० रुग्णांना एकत्र पाठवले जाईल.
( तहसील हेडक्वार्टर येथे राहणारे, किंवा गडचिरोली मधील जिल्ह्या हेडक्वार्टर मधील, किंवा दुसर्या जिल्हातील रुग्ण, शासकीय कर्मचारी , मध्यम व उच्च वर्गीय, व्यापारी वर्ग नौकरी करणारे व कुटुंबिय यांना सर्च रुग्णालयाची आर्थिक सवलत राहणार नाही.)
तरी गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांनी या आर्थिक सुविधेचा लाभ करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालय करीत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #serchchatgao #drabhaybang #drranibang #serchhospital )