रांगी ग्रामपंचायतीत महात्मा गांधी-लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

8

रांगी ग्रामपंचायतीत महात्मा गांधी-लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
– आवास योजनांचा आढावा
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ०४ : तालुक्यातील रांगी ग्रामपंचायतीच्या सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती गुरुवारी (२ ऑक्टोबर) उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे प्रकल्प अधिकारी काळभोर होते.
गटविकास अधिकारी रोषण कुमार दुबे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी धूपबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली.
जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायत परिसरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात ग्रामपंचायतमधील नागरिक तसेच कर्मचारी सहभागी झाले.
यानंतर काळभोर आणि दुबे यांनी ग्रामपंचायतीतील विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजनेच्या प्रगतीची माहिती घेण्यात आली. तसेच ‘पीएम सूर्यघर’ योजनेअंतर्गत सौर पॅनेल बसविण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या घरांना भेट देऊन पाहणी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत रांगीचे प्रशासक नरेंद्र मस्के, ग्रामपंचायत अधिकारी मकरंद बांबोळे, पंचायत समिती धानोरा येथील घरकूल विभागाच्या कन्नाके, चव्हाण, रामटेके, उमेदचे तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामपंचायत रांगी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here