चामोर्शी : रानडुकराची शिकार प्रकरणी तिघांना बेड्या

149

– ६ ऑक्टोबरपर्यंत वनकोठडी, रानडुकराचे अवशेष व शस्त्रसामग्री जप्त
The गडविश्व
चामोर्शी, दि. ०५ : तालुक्यातील मार्कडा (कंसोबा) परिक्षेत्रात रानडुकराची बेकायदेशीर शिकार करून त्याचे मास विक्री करणाऱ्या तिघांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या तिघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
अटकेतील आरोपींची नावे संध्या रामकृष्ण मल्लिक, अरुण परिमल बाछाड आणि किरण भावेन मंडल (सर्व रा. गांधीनगर) अशी आहेत. वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मार्कडा (कंसोबा) परिक्षेत्रात पथकाने अचानक धाड टाकली. या कारवाईत रानडुकराच्या शिकारीचे अवशेष, वापरलेली शस्त्रसामग्री आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी शिकार केल्याची कबुली दिल्याचे समजते.
गांधीनगर परिसरात यापूर्वीही वन्यप्राण्यांच्या शिकारी झाल्याच्या तक्रारी मिळाल्या असून स्थानिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोपींनी यापूर्वीही अशा शिकारी केल्या का, याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.
ही कारवाई उपवनसंरक्षक तलमले आणि सहाय्यक वनसंरक्षक मोहम्मद आझाद यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा मोढळे यांच्या पथकाने केली. पथकात क्षेत्र सहाय्यक आर. बनोत, वनरक्षक सोनवणे, अक्षय राऊत, राठोड, मडावी, आखाडे आणि इतर कर्मचारी सहभागी होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #tadobaforest #forestcrime #Gadchiroli #Chamorshi #Aashti #WildlifeProtection #WildBoarHunting #ForestDepartmentAction #IllegalHunting #WildlifeCrime #MaharashtraNews #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here