संत गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर : युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
The गडविश्व
कुरखेडा, दि. १५ : संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामजयंतीचे औचित्य साधून श्री संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार समाज, राणा प्रताप वॉर्ड, कुंभार मोहला व सहकारी मंडळी यांच्या वतीने बुधवारी (दि. १५ एप्रिल) सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष जीवन नाट यांच्या हस्ते संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. यावेळी कुंभार समाजाचे वयोवृद्ध मार्गदर्शक तुकाराम बुरबादे, ऋषी कोटांगले, शेषराव ठाकरे, पुरुषोत्तम बुरबांदे, परसराम पात्रे, रामाजी किरंगे, गजानन मठ्ठे आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात समाजातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. आशिष काळे, नितेश वरवडे, भावेश मुंगणकर, लीलाधर बुरबांदे, खुशाल बनसोड, ईश्वर वझे, देवेंद्र फाये, ईश्वर ठाकरे, भूषण लाकडे, वसंता बुरबांदे, रुपेश मट्ठे, कुंदन देशमुख, देविदास देशमुख, सागर पडोळे, विनोद खंडाईत, रोहित निपाने, हेमराज नरोटे, विनोद बुरबांदे आदींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
वैद्यकीय पथकात डॉ. जगदीश बोरकर, डॉ. अंकित बोरसरे, ललित डोंबळे, नयन मोहुर्ले, रीना गणवीर, शरद बांबोडे, बंडू कुंभारे, सपना तूरतमारे, खुशी वझाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मंडळातील कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास कुंभार समाजाचे पदाधिकारी भास्कर गुंडरे, तुळशीराम बुरबांदे, रमेश पात्रे, मुरारी कोटांगले, प्रशांत कोटांगले, हेमंत पात्रे, महेश कोटांगले, हिमांशू बुरबांदे, टोमेश्वर बुरबांदे, उमेश गुंडरे, कार्तिक कोटांगले, गोलू गुंडरे, जितू पात्रे, गिरधर पात्रे, नितेश पात्रे आदी उपस्थित होते. तसेच आशिष भाऊ काळे (नगरसेवक), गजानन भोयर, कांताबाई मट्ठे (नगरसेविका), राकेश चव्हाण, उस्मानखा पठाण, सिराजभाऊ पठाण, सागर निरंकारी, अॅड. उमेश वालदे, उल्हास देशमुख आदींचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, आज सायंकाळी ५ वाजता संत गोरोबा काका मंदिरात घटस्थापना होणार असून, सायं. ६.३० वाजता सामुदायिक प्रार्थना, ७ वाजता हरिपाठ आणि रात्री ९ वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार (दि. १६ एप्रिल) रोजी दुपारी २ वाजता गोपालकाला तर सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.














