खनिज कर्म योजनेतून आंचिव हायस्कूलच्या विद्यार्थिनींना सायकल वाटप
– शिक्षणाचा प्रवास होणार अधिक सुलभ, ग्रामीण विद्यार्थिनींना मोठा दिलासा
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०६ : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या खनिज कर्म योजनेअंतर्गत आंचिव हायस्कूल, चिखली येथे इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत एकूण सात विद्यार्थिनींना सायकली प्रदान करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मनोज डाहाळे होते. यावेळी सहाय्यक शिक्षक मुंगमोडे, मरस्कोल्हे, तृप्ती राखडे, अस्मिता भैसारे, दहिवले, मेश्राम तसेच मडावी मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी उमेश उपराडे, धनंजय जणबंधू, उलसीबाई हारामी, कविता राऊत, जयमाला बावणे आणि अनमोल बहेटवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी खनिज कर्म योजनेच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळणार असून, ग्रामीण भागातील मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.














